---Advertisement---
जळगाव जिल्हा राष्ट्रीय विशेष सरकारी योजना

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक; यात मिळेल शून्य जोखमीवर चांगला परतावा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । कोणत्याही योजनेत गुंतवणूक करतांना कमी जोखीम व चांगला परतावा या दोन गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जातात. तुम्ही जर गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर पोस्ट ऑफिसच्या काही योजना अशा आहेत, ज्यात तुम्हाला शून्य जोखमीवर चांगला परतावा मिळू शकेल. पोस्ट ऑफिसची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावर सरकारी हमी असते. म्हणजेच, येथे जोखीम घटक खूप कमी आहे.

post office

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (TD) :- ही पोस्ट ऑफिसची एक योजना असून या योजनेअंतर्गत १ वर्ष ते ३ वर्षांपर्यंत सध्या ५.५% व्याज मिळत आहे. तुम्ही यामध्ये गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे सुमारे १३ वर्षांत दुप्पट होतील. त्याचप्रमाणे, तुम्हाला ५ वर्षांच्या मुदत ठेवीवर ६.७% व्याज मिळत आहे. या व्याजदराने पैसे गुंतवले तर तुमचे पैसे सुमारे १०.७५ वर्षांत दुप्पट होतील.

---Advertisement---

पोस्ट ऑफिस बचत बँक खाते :- तुम्ही तुमचे पैसे पोस्ट ऑफिस बचत खात्यात ठेवल्यास, पैसे दुप्पट होण्यासाठी तुम्हाला बराच काळ वाट पाहावी लागेल. कारण यामध्ये फक्त ४.० टक्के व्याज मिळते, म्हणजेच तुमचे पैसे १८ वर्षात दुप्पट होतील.

पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव :- सध्या तुम्हाला पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) वर ५.८% व्याज दिले जात आहे, त्यामुळे या व्याजदराने पैसे गुंतवले तर साधारण १२.४१ वर्षात ते दुप्पट होईल.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना :- पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (MIS) वर सध्या ६.६% व्याज मिळत आहे, जर या व्याजदराने पैसे गुंतवले तर ते १०.९१ वर्षात दुप्पट होईल.

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना :- पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) वर सध्या ७.४% व्याज दिले जात आहे. या योजनेत तुमचे पैसे सुमारे ९.७३ वर्षांत दुप्पट होतील.

पोस्ट ऑफिस पीपीएफ :- पोस्ट ऑफिसच्या १५ वर्षांच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर (PPF) सध्या ७.१% व्याज मिळत आहे. म्हणजेच, या दराने तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे १०.१४ वर्षे लागतील.

पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी खाते :- पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी खाते योजनेवर सध्या सर्वाधिक ७.६ टक्के व्याज मिळत आहे. मुलींसाठी चालवल्या जात असलेल्या या योजनेत पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे ९.४७ वर्षे लागतील.

पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र :- सध्या पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वर ६.८% व्याज दिले जात आहे. ही ५ वर्षांची बचत योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून आयकर देखील वाचवला जाऊ शकतो. जर या व्याजदराने पैसे गुंतवले गेले तर ते सुमारे १०.५९ वर्षांत दुप्पट होईल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---