जळगाव जिल्हा
गोदावरीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२४ । जळगाव येथील गोदावरी फॉउंडेशन अंतर्गत गोदावरी टीआयएफएस डब्ल्यु प्रकल्पातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रकल्पाअंतर्गत एचआयव्ही,एडस चा प्रतिबंध करण्यासाठी पीईची नेमणूक करण्यात आली आहे. यातून तीन महिला पीईंचा सत्कार डीपीओ संजय पहूरकर यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प संचालक राजेंद्र पाटील, मार्गदर्शक जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर, लॅब टेक्निशियन सुवर्णा साळुंखे, समुपदेशक निशिंगधा बागुल यांची उपस्थीती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प व्यवस्थापक काशिनाथ पाटील, समुपदेशक संदीप पाचपोळे लेखापाल यांनी परिश्रम घेतले.