नूतन मराठा ९ रोजी आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषद
जळगाव लाईव्ह न्यूज | ७ एप्रिल २०२२ | महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष व भारतीय स्वातंत्र्याचे ७५ वर्ष आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने नूतन मराठा महाविद्यालय व क बचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ याच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे ९ एप्रिल रोजी कब चौ.उ.म. विद्यापीठाच्या सिनेट हॉल मध्ये आयोजन करण्यात आलेले आहे. या परिषदेचे उदघाटन क. ब. चौ.उ.म. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. डॉ.व्ही.एल.माहेश्वरी हे करणार आहेत.
या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय व्याख्याता डॉ.सुजाता सिंधी व अध्यक्ष म्हणून क.ब.चौ.उ.म.वी. व्यवस्थापन परिषद सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख हे असणार असून प्रा.डॉ.एम.डी.जहागीरदार, औरंगाबाद प्रा.डॉ.माया इंगळे इंदौर, प्रा.डॉ.अनिल चिकाटे, प्रा. डॉ.पी.एस.कुलकर्णी औरंगाबाद, प्रा.डॉ.शाम साळुंखे इत्यादीचे व्याख्यान होणार आहेत.
या परिषदेसाठी जगभरातून एकूण ४५० प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यातून २३५ संशोधन पेपर आलेले आहेत.
या परिषदेसाठी मुख्य नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख हे असून, परिषदेचे संयोजक प्रा.डॉ.ए.वाय. बडगुजर व परिषदेचे आयोजन सचिव प्रा.बी.सी पाटील हे आहेत. यासोबत सदस्य म्हणून प्रा.डॉ.एन.जे.पाटील, प्रा.डॉ.एस.ए.गायकवाड, प्रा.राजेंद्र देशमुख, प्रा.डॉ.सौ. इंदिरा पाटील, प्रा.डॉ.एस.की. पडलवार, प्रा.एन.बी.बाविस्कर, प्रा.डॉ.डी.आर.चव्हाण, प्रा.डॉ. राहुल संदानशिव याशिवाय 8 उपसमित्या कार्यरत आहेत.
परिषदेच्या समारोपासाठी क.ब.चौ. उ.म. विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा.डॉ.एस.टी.इंगळे हे उपस्थित राहणार आहेत.