⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | कृषी | वाकोद येथील शेतकऱ्याने घेतले सीताफळात शेवगा, कांदा, अद्रकाचे आंतरपीक

वाकोद येथील शेतकऱ्याने घेतले सीताफळात शेवगा, कांदा, अद्रकाचे आंतरपीक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लिव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । वाकोद येथील शेतकरी संजय सपकाळ यांनी सीताफळांची लागवड करून त्यात कांदा, अद्रक यांचे अंतरपीक घेण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांनी आपल्या शेतात १६ फुटांच्या अंतरावर सीताफळ लागवड करून आठ फुटांवर शेवगा लागवड केली आहे. आठ फूट रूंद असलेल्या जागेवर कांदा व अद्रक लागवड करून त्याचेही उत्पादन घेतले. पावणेतीन एकरात आतापर्यंत त्यांनी सव्वा लाख रूपयांचा शेवगा, दीड लाखांचे सीताफळ विक्री केले.

रोगराई आणि कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळे मधमाशांची संख्या घटल्याने कांद्याच्या उत्पादनावर परिणाम जाणवत आहे. क मधमाशांमुळे सूर्यफूल व कांद्यासह फुलवर्गीय पिकांचे परागीकरण होते. त्यामुळे मधमाशा नसल्यास कांद्याचे फूल व पूर्ण क्षमतेने बीज निघत नाही. त्यामुळे कांदा पीक बहरून आल्याचे दिसत असले तरी त्यामध्ये मोरणी पडल्याची संख्या अधिक झाल्याचे दिसते. यावर उपाय म्हणून संजय सपकाळ यांनी शेतात मधमाशा येण्यासाठी ऊसाचे चिपाड, गुळाचे पाणी, ताक, विलायची यांचा वापर केला. त्यामुळे शेतात मधमाशांची पोळे जागोजागी दिसत आहेत.

एक एकरपेक्षा कमी क्षेत्रात कांदा लागवड केली असून त्यातून दीड लाख रूपयांचे उत्पन्न हाती येईल असा अंदाज आहे. तर अर्धा एकर क्षेत्रात अद्रकातून ४० ते ५० हजार रूपये उत्पन्न होईल असा अंदाज आहे. आतापर्यंत सर्व पिकांना ५० हजार रूपये लागवड खर्च आला आहे. एकूण सर्व पिकांचे उत्पन्न खर्च वजा करून पाच लाखापर्यंत होईल असे शेतकरी संजय सपकाळे यांनी सांगितले.
वाकोद येथील संजय सपकाळे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.