विरोधकांचा आवाज दाबण्यापेक्षा यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या – आ. एकनाथराव खडसे
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । आम्ही कधीच कोणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला नाही. आजकालचे राजकारण बदलले आहे. सत्ताधारी पक्ष विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत करीत आहे. म्हणून मुक्ताईनगरात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची सभा होऊ देण्यात आली नाही. असा दावा आ. एकनाथराव खडसे यांनी केला आहे. ते हरताळा येथे बोलत होते.
मुक्ताईनगरात सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेच्या ३२ व्या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द हरताळा येथे माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महासंघाच्या उपाध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे खेवलकर उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खडसे म्हणाले की, मुक्ताईनगरात होणारी सभा होवू देण्यात आलीनाही. विरोधकांचा आवाज दाबण्यापेक्षा उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी होती. याच बरोबर मी मतदारसंघात अनेक विकासकामे केली. राहिलेली विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यामुळे आतापर्यंत जशी साथ दिली ती साथ कायम राहू द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, निवृत्ती पाटील, ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यु.डी. पाटील, पवन पाटील, विलास धायडे, प्रदीप साळुंखे, समाधान कार्ले, रामभाऊ पाटील, बाळा भालशंकर, बबलू सापधरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते..