⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | रेल्वेला आग लागल्याची माहिती, यंत्रणेची सतर्कता, महापौरांची धाव

रेल्वेला आग लागल्याची माहिती, यंत्रणेची सतर्कता, महापौरांची धाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । जळगाव रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अहमदाबाद – बरौनी एक्सप्रेस या रेल्वेला आग लागल्याची माहिती कळताच यंत्रणाची धावपळ उडाली. रेल्वे प्रशासन आणि जळगाव मनपाचे पथक पोहचले आणि पथकाने रेल्वेचा डबा थंड केले. महापौर जयश्री महाजन यांनी तात्काळ धाव घेत माहिती जाणून घेतली.

वाढत्या उष्णतेमुळे एक्सप्रेसचे इंजिन, चाक गरम होऊन धूर निघण्याच्या घटना वाढल्या आहेत. रविवारी देखील नेपानगरजवळ कर्नाटक एक्सप्रेसचे चाक गरम होऊन धूर निघू लागला होता. सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास बरौनी एक्सप्रेसला आग लागल्याची घटना घडली होती. सुदैवाने वेळीच प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.

अहमदाबादकडून बरौनीकडे जाणाऱ्या डाऊन एक्सप्रेसच्या एस ७ बोगीच्या चाकाजवळ आग लागत असल्याची माहिती अत्याधुनिक यंत्रणेमुळे मिळाली होती. जळगाव रेल्वे प्रशासन आणि जळगाव मनपा प्रशासन लागलीच अलर्ट होऊन कामाला लागले होते. जळगाव मनपाच्या अग्निशमन दलाचे ३ बंब तात्काळ रेल्वे स्थानक परिसरात पोहचले.

फायर एक्सत्रूरुनजरने लागलीच आग आटोक्यात आणण्यात आली. घटनेची माहिती कळताच महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भेट देत घटनेची माहिती घेतली.

जळगाव मनपाचे अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, सहा.अग्निशमन अधिकारी सुनील मोरे, फायरमन अश्वजित घरडे, तेजस जोशी, वाहन चालक वसंत न्हावी, भारत बारी, रवी बोरसे, नितीन बारी, वाहन चालक नारायण चांदेलकर, शिवा तायडे, पुंडलिक सपकाळे, वाहन चालक विक्रांत घोडेस्वार, सोपान कोल्हे, निलेश सुर्वे, नंदकिशोर खडके यांच्यासह घटनास्थळी ३ अग्निशमन बंब दाखल होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह