आनंदाची बातमी ! आता जळगावहून लवकरच इंदूर विमानसेवा..

जानेवारी 22, 2026 1:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगाव विमानतळावरून गोवा, हैदराबाद, पुणे, मुंबई यांसारख्या शहरांसाठी विमानसेवा आधीपासून सुरू असून या सेवेला जळगावकरांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. यानंतर आता जळगावहून इंदूरला थेट विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे. ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीकडून या मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी हालचाली वेगात सुरू असून, येत्या काही दिवसात या सेवेचे वेळापत्रक आणि तिकीट दरांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

jalgaon airport jpg webp

जळगावहुन इंदौरसाठी थेट रेल्वे सेवा उपब्लध नाहीय. यामुळे जळगावकरांना खासगी बससेवेचा आधार घेऊन प्रवास करावा लागतो. मात्र आता जळगाव लवकरच विमानसेवेद्वारे इंदूरशी जोडले जाणार आहे. ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीने या मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

Advertisements

जळगाव विमानतळावर नाईट लँडिंगसह इतर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने नवीन विमान कंपन्यांना सेवा विस्तार करणे सोपे झाले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव–इंदूर ही देशांतर्गत विमानसेवा विनाविलंब सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisements

छत्रपती संभाजीनगर पर्यटन विकास संस्थेच्या नागरी विमान वाहतूक समिती आणि जनसंपर्क समितीचे अध्यक्ष सुनील कोठारी यांनी यासंदर्भात माहिती दिली. काही दिवसांत या सेवेचे वेळापत्रक आणि तिकीट दरांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

सध्या जळगावमधून मुंबई, पुणे यासारख्या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू असल्याने प्रवाशांचा वेळ वाचत आहे. आता इंदूरशी थेट कनेक्टिव्हिटी मिळाल्यास शैक्षणिक, वैद्यकीय आणि व्यापारी दृष्टिकोनातून ही विमानसेवा जळगावकरांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार असून, जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now