⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

१ जुलैपासून रेल्वे ज्येष्ठ नागरिकांसाठी पुन्हा सुरु करणार ‘ही’ सेवा?

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२२ । कोरोना काळात रेल्वेने अनेक सेवा बंद केल्या होत्या. मात्र परिस्थिती पूर्वपदावर आल्याने रेल्वे आता या सेवा पुन्हा सुरू करत आहे. उदाहरणार्थ, बहुतेक गाड्यांमध्ये ब्लँकेट आणि बेडरोल सुविधा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय जनरलचे तिकीटही मिळू लागले आहे. पण प्रवाशांना सर्वाधिक प्रतीक्षा असते ती ट्रेनमधील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सवलत (Senior Citizens Concession Indian Railways), ज्याच्या बातम्या वारंवार येत असतात.

ज्येष्ठ नागरिकांना सवलती मिळतील
कोरोनापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या तिकिटांवर सवलत मिळायची, जी सध्या बंद आहे. पण एका बातमीत दावा केला जात आहे की 1 जुलै 2022 पासून पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांना ट्रेनमध्ये दिलेली सूट बहाल केली जाईल. हा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पण आम्ही तुम्हाला सांगतो की ही बातमी फेक न्यूज आहे, कारण आतापर्यंत रेल्वेकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. याची चौकशी केल्यानंतर पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

पीआयबीने माहिती दिली
पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट केले की, ‘भारतीय रेल्वे 1 जुलै 2022 पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती पुन्हा सुरू करणार असल्याचा दावा बनावट मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. सध्या दिव्यांगजन, रुग्ण आणि विद्यार्थी यांनाच भारतीय रेल्वेकडून सवलत दिली जात आहे.