⁠ 
शनिवार, मे 4, 2024

देशसेवेची संधी! भारतीय लष्करात निघाली बंपर भरती, अडीच लाखापर्यंत पगार मिळेल

जळगाव लाईव्ह न्यूज । भरती संदर्भ । भारतीय लष्करात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारतीय सैन्याच्या वतीने, भारतीय सैन्य शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) ने विविध पदे भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. एकूण 381 पदांसाठी ही भरती राबविली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 ही आहे. Indian Army SSC Tech

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र अविवाहित पुरुष आणि अविवाहित महिला अभियांत्रिकी पदवीधर आणि भारतीय सशस्त्र दलाच्या संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवा यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत

पदांचा तपशील
ही भरती 381 पदांवर असेल, त्यापैकी 350 पदे SSC (Tech) पुरुषांसाठी, 29 SSC (Tech) महिलांसाठी आणि 2 पदे संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवांसाठी आहेत.

कोण अर्ज करू शकतो.
इंडियन आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) पुरुष, महिला उमेदवारांसाठी, 01 ऑक्टोबर 2024 रोजी वय 20 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे. भारतीय सशस्त्र दलाच्या विधवांसाठी, 1 ऑक्टोबर 2024 रोजी कमाल वय 35 वर्षे आहे. अर्ज करणारे उमेदवार जे अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण आहेत किंवा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात आहेत ते अर्ज करण्यास पात्र असतील.

पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 56,100/- रुपये ते 2,50,000/- रुपये पगार मिळेल.
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online