जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२ । भारतीय लष्कराचे विद्यमान जनरल एम.एम.नरवणे हे शनिवारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सेवाजेष्ठतेनुसार जनरल मनोज पांडे यांनी लष्कराचे २९ वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. देशातील सर्वात बलवान दलाचे नेतृत्व करणारे अभियंता गटातून नियुक्त केलेले ते पहिले अधिकारी बनले आहेत. लेफ्टनंट जनरल पांडे हे भारतीय सैन्य दलातील सर्वात ज्येष्ठ लेफ्टनंट जनरल आहेत. १ फेब्रुवारी रोजी लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, जनरल पांडे पूर्व आर्मी कमांडचे प्रमुख होते. त्यांनी सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश सेक्टरमधील वास्तविक नियंत्रण रेषेचे (LAC) रक्षण करण्याची जबाबदारी सांभाळली आहे.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे ६ मे रोजी ६० वर्षांचे पूर्ण होत असून भारतीय सैन्य दलात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावले आहे. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी एक ‘जनरल केडर’ ब्रिगेडियर म्हणून, जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पायदळ ब्रिगेडचे नेतृत्व केले आणि त्यानंतर मेजर जनरल म्हणून पश्चिम लडाखच्या उंच भागात असलेल्या पर्वतीय विभागाचे नेतृत्व देखील केले केले. त्यांनी सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश सेक्टरमधील वास्तविक नियंत्रण रेषेचे (LAC) रक्षण करण्याची जबाबदारी सांभाळली आहे.
लेफ्टनंट जनरल पांडे हे जून २०२० ते मे २०२१ पर्यंत युनिफाइड अंदमान आणि निकोबार कमांडचे (ANC) प्रमुख होते. नॅशनल डिफेन्स अकादमीचे माजी विद्यार्थी असल्याने त्यांना डिसेंबर १९८२ मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स (द बॉम्बे सॅपर्स) मध्ये नियुक्त करण्यात आले होते. अनेक मोठ्या कारवाया आणि सीमेलगतच्या क्षेत्रात त्यांनी आजवर सेवा दिली आहे.