⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | नोकरी संधी | भारतीय डाक विभागात तब्बल 30 हजार जागांसाठी भरती ; पात्रता फक्त 10वी पास

भारतीय डाक विभागात तब्बल 30 हजार जागांसाठी भरती ; पात्रता फक्त 10वी पास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. भारतीय डाक विभागात 30 हजाराहून अधिक पदांसाठी मेगाभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. India Post Recruitment 2023

३ ऑगस्टपासून म्हणजेच आज गुरुवारपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याचबरोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट ठेवण्यात आली आहे. मात्र, उमेदवारांना 24 ते 26 ऑगस्ट या कालावधीत फॉर्ममध्ये दुरुस्ती करता येणार आहे.

एकूण जागा : 30041

पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS)

पदांचा तपशील :
1) GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

भरतीसाठी आवश्यक पात्रता :
i) 10वी उत्तीर्ण (ii) यासोबतच उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान आणि संगणक व सायकलिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

अर्ज फी
सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी अर्ज शुल्क १०० रुपये ठेवण्यात आले आहे. तर SC, ST, PWD आणि महिलांसाठी अर्ज विनामूल्य ठेवण्यात आले आहेत. उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्जाची फी भरू शकतात.

वयोमर्यादा :
किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे ठेवण्यात आले आहे. 23 ऑगस्ट 2023 आधार म्हणून वयाची गणना केली जाईल. तथापि, OBC, EWS, SC, ST आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही भारत सरकारच्या नियमांनुसार सूट दिली जाईल.

निवड प्रक्रिया
उमेदवारांना 10वीच्या गुणांच्या आधारे निवडले जाईल. त्यानंतर कागदपत्रे पडताळणीसाठी मागवली जातील. नंतर वैद्यकीय चाचणी घेतली जाईल आणि अंतिम यादी जारी केली जाईल.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2023
अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 24 ते 26 ऑगस्ट 2023

इतका पगार मिळेल?
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर – 10,000/- ते 24,470/-
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर- 12,000/- ते 29,380/-

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.