जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२६ । जळगाव महापालिकेसाठी काल मतदान झालं. आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरूवात झाली. या निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान महायुतीचेच वर्चस्व दिसून आले आहे. तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे. दरम्यान जळगाव महापालिकेत अपक्ष उमेदवाराने अखेर खातं उघडलं आहे.

जळगावच्या प्रभाग क्रमांक 1 ड मध्ये अपक्ष उमेदवार भारती सोनवणे विजयी झाल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार फरदीन खान यांचा पराभव झाला आहे. जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या उमेदवारांनी अद्यापही खातं उघडलेलं नाही.




