जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ । आपल्या शरीरातील महत्वाचा भाग म्हणजे फुफ्फुस हे जितके निरोगी तितकं आपलं आरोग्य चांगलं असत कोरोना विषाणूचा हल्ला देखील फुफ्फुसांवरच आहे परंतु त्या आधी देखील फुफ्फुसाचा सांसर्गिक ‘न्युमोनिया’ हा आहे. आज न्युमोनिया बद्दल जाणून घ्यायचं कारण म्हणजे आज आहे १२ नोव्हेंबर हा दिवस जागतिक न्युमोनिया म्हणून ओळखला जातो.
काय आहे ‘न्युमोनिया’
‘न्युमोनिया’ हा फुफ्फुसांचा सांसर्गिक आहे. ह्यामध्ये फुफ्फुसांच्या आतील अल्वोली – म्हणजे श्वसनसंस्थेच्या अगदी बारीक नलिका ज्या फुफ्फुसांमध्ये वायूच्या हस्तांतरणाचे काम करतात त्या न्युमोनियाकोकस जीवाणूच्या संसर्गास बळी पडतात आणि परिणामी फुफ्फुसांमध्ये द्रव साठू लागतो. ह्या द्रवामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते व त्यात कफसारखा द्रव जमुन रहातो. न्युमोनियामध्ये एक किंवा दोन्ही फुफ्फुसांना संसर्ग होऊ शकतो.
न्यूमोनिया हे लक्षण आहे. नेमक्या आजाराचे नाव नाही. पण डॉक्टर न्यूमोनिया फारसा काळजी करण्यासारखा आजार असल्याचे सांगतात. या आजारात प्रचलित असलेली आणखी एक वैद्यकीय शब्द म्ह्णजे डबल न्यूमोनिया- म्ह्णजे दोन्ही फुफ्फुसामध्ये संसर्ग पोहोचल्याचे लक्षण. दोन्ही फुफ्फुसामध्ये संसर्ग होणे ही सामान्य बाब आहे. न्यूमोनियामध्ये फुफ्फुसामध्ये जिवाणू, विषाणू किंवा कवकांचा संसर्ग होतो. फुफ्फुसाच्या वायुकलिकामध्ये द्रव किंवा पू साठतो. यामुळे वायुकलिकामधून पुरेसा ऑक्सिजन शरीरास मिळत नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पेशींचे कार्य नीट्से होत नाही. योग्य उपचार केले नाहीत तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे व्यक्तीचा मृत्यू ओढवतो. सध्या उत्तम उपचार उपलब्ध असल्याने न्यूमोनियाने मरण पावणा-या व्यक्तींची संख्या कमी झाली आहे. तरी पण जगभराच्या म्रृत्यूचे न्यूमोनिया हे सातवे कारण आहे.
काय आहे न्यूमोनियाची लक्षणे
ताप, थंडी वाजणे, खोकला, श्वास जलद होणे (गति वाढणे), श्वास घेताना धाप लागणे, छातीत आणि पोटात दुखणे, शक्तिपात, उलट्या, इ.
-जिवाणूजन्य न्यूमोनिया हळुवारपणे किंवा एकाएकी उत्पन्न होतो.
-विषाणूजन्य न्यूमोनियाची प्रारंभीच्या काळातील लक्षणे फ्लूसारखी असतात.
याशिवाय 12-36 तासात रुग्णास अधिकाधिक श्रेणीमध्ये श्वास लागतो. श्वसन अपुरे होते, कफ़ तीव्र होतो, थोडा कफ पडतो. ताप वाढतो.श्वास घेणे कठीण होते. आणि ओठ निळे पडतात. टोकाच्या गुंतागुंतीमध्ये जिवाणू संसर्ग होतो.
– मायकोप्लाझमा न्यूमोनियाची लक्षणे भिन्न आहेत. याला चालता फिरता (वॉकिंग) न्यूमोनिया म्हणतात. याची लक्षणे विविध आहेत. एकसारखी लक्षणे नसणे हेच याचे वैशिष्ट्य.घसा खवखवण्यापासून झालेल्या लक्षणांचा प्रारंभ दीर्घकाळ चाललेल्या खोकल्यामध्ये होतो. दम्याच्या रुग्णामध्ये मायकोप्लाझमा न्यूमोनिया तीव्र आणि दीर्घकालीन स्वरूप घेतो.
खोकला अनेक कारणांमुळे होऊ शकतो. धूम्रपानासोबतच संसर्ग अगदी रासायनिक संपर्कामुळे देखील खोकला येतो. या प्रकारच्या खोकल्याला उपचारांची अजिबात आवश्यकता नसते. परंतु आपल्याला हे कसे समजेल की हा खोकला न्यूमोनियाचा आहे की नाही? तर खोकला बरा होण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच वाढत असेल तर ते न्यूमोनियाचे लक्षण आहे. सर्दी किंवा फ्लू झाल्यानंतर आजारी वाटणार्या कोणत्याही व्यक्तीने वैद्यकीय चाचणी करावीच. जर एखाद्या व्यक्तीला कफमुळे खोकला लागला असेल, विशेषतः जर कफ दाट, हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचा असेल तर थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि वेळ न घालवता डॉक्टरांशी संपर्क साधावा.
जर आपल्याला १०२ डिग्री फॅरेनहाइट किंवा त्याहून अधिक ताप असल्यास डॉक्टरांकडे जाण्यास उशीर करू नका. ताप आणि थंडी ही न्यूमोनियाची सामान्य लक्षणे असली तरीही 105 डिग्री फॅरेनहाइटचा ताप न्यूमोनिया दर्शवितो. जर तुम्ही कुटुंबातील एखाद्या वृद्ध सदस्य किंवा मित्राची काळजी घेत असाल तर हे लक्षात ठेवा की कधी कधी 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कमी ताप असताना देखील न्यूमोनिया होऊ शकतो.
न्यूमोनिया टाळण्यासाठी धूम्रपान सोडणे आवश्यक आहे. ही सवय तुम्हाला श्वसन संक्रमण, विशेषत: न्यूमोनिया होण्यास अधिक संवेदनशील बनवते.
१) साबण आणि पाण्याने नियमितपणे हात स्वच्छ धुवा
२) खोकताना आणि शिंकताना तोंडावर हात ठेवा. यासाठी वापरल्या गेलेल्या टिश्यूंची त्वरित विल्हेवाट लावा
३) रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा
४) पुरेशी विश्रांती घ्या, निरोगी आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा
५) तशी तर फ्लूची लस लावून न्यूमोनियाचा धोका वाढण्यापासून रोखता येऊ शकतो. न्यूमोनियाच्या गंभीर लक्षणांमध्ये उच्च ताप, छातीत दुखणे, श्वास लागणे आणि सतत खोकला यांचा समावेश आहे. म्हणूनच, जेव्हा तुम्हाला अशी न्यूमोनियाची एक किंवा अधिक लक्षणे दिसू लागतील तेव्हा ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.