जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२५ । देशात सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. आगामी मोठे सण दसरा, दिवाळी काळात रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते. या सणासुदी काळात प्रवाशांसाठी रेल्वेकडून अनेक विशेष गाड्या चालविण्यात येतात. दरम्यान यातच रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी विविध साप्ताहिक विशेष गाड्यांच्या कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष या गाड्या भुसावळ आणि जळगाव मार्गे धावणाऱ्या असून यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली आहे. या विस्तारामुळे प्रवाशांना सुट्टीच्या काळात अधिक सुविधा उपलब्ध होतील.विशेष म्हणजे या गाड्यांचे वेळापत्रक, थांबे व संरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

या विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ?
क्र. ०९०४५ उधना पाटणा विशेष गाडी आणि क्र. ०९०३९ उधना धनबाद विशेष गाडी- २६ डिसेंबरपर्यंत, क्र. गाडी क्र. ०९०४६ पाटणा – उधना विशेष गाडी २७ डिसेंबरपर्यंत, गाडी क्र. ०४१५५७ सुबेदारगंज उधना, क्र. ०९०२५ वलसाड दानापूर विशेष गाडी आणि गाडी क्र. ०९०३२ जयनगर उधना विशेष गाडी २९ डिसेंबर, गाडी क्र. ०४१५६ उधना सुबेदारगंज आणि गाडी क्र. ०९०२६ दानापूर वलसाड विशेष गाडी ३० डिसेंबरपर्यंत, क्र. ०९०५९ उधना खुर्दा रोड विशेष गाडी ३१ डिसेंबरपर्यंत, तर क्र. ०९०६० खुर्दा रोड – उधना विशेष गाडीची मुदत २ जानेवारी २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.








