जळगावमार्गे गुजरातकडे जाणाऱ्या आणखी एका ट्रेनच्या कालावधीत वाढ

जानेवारी 5, 2026 3:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव, भुसावळमार्गे गुजरातमधील उधनापर्यंत प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने उधना ते खुर्दा रोड दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गुजरात, महाराष्ट्र आणि ओडिशा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल.

train

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ०९०५९ उधना ते खुर्दा रोड साप्ताहिक विशेष गाडी आता २५ फेब्रुवारीपर्यंत चालवण्यात येणार आहे. तसेच ०९०६० खुर्दा रोड उधना ही परतीची साप्ताहिक विशेष गाडी २७ फेब्रुवारीपर्यंत चालवण्यात येईल. या दोन्ही विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात तसेच थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Advertisements

या दोन्ही गाड्या गुजरात, महाराष्ट्र आणि ओडिशाला जोडतात. त्यामुळे गाड्यांना मिळालेली मुदतवाढ या भागात प्रवास करणाऱ्यांची गैरसोय दूर करणारी ठरेल. या आधी सुद्धा प्रवाशानाने गुजरातकडून उत्तर भारतात जाणाऱ्या विशेष गाड्यांचा कालावधी वाढवला आहे. माघ यात्रेसाठी प्रयागराजकडे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी विशेष गाड्यांना अतिरिक्त थांबादेखील मंजूर केला आहे.

Advertisements

या गाडीला व्यारा, नंदुरबार, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, तुमसर रोड जं, गोंदिया, दुर्ग, रायपूरसह

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now