खाद्यतेलाच्या दरवाढीचा भडका ! सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले

जानेवारी 27, 2026 12:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे वाढत्या महागाईमुळे घरगुती बजेटवर ताण वाढला असताना खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली. यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले आहे. विशेष सण-वार नसतानाही खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. सध्या सोयाबीन तेल प्रतिलिटर सुमारे १३६ ते १४०, तर शेंगदाणा तेल १६५ ते १९८ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. हे दर पुढील काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

oil 2

ही आहेत दरवाढीमागे कारणे?
गेल्या अनेक दिवसांपासून खाद्यतेलाच्या भावात वाढ नव्हती. मात्र, कमी अधिक तसेच अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान, सोयाबीनच्या किमान आधारभूत किमतीत झालेली वाढ, डॉलरचे दर वाढणे व पाठोपाठ शेंगदाणा उत्पादन कमी झाल्याने तेलाच्या दरात वाढ झाली आहे.

Advertisements

शेंगदाणा तेलाच्या दरात सर्वाधिक वाढ
साधारण दीड वर्षापासून सोयाबीन तेलाच्या दरामध्ये फारशी वाढ झाली नव्हती, तर इतर तेलाच्या दरात किरकोळ चढ-उतार सुरू होता. गेल्या दोन महिन्यात सर्वाधिक दरवाढ ही शेंगदाणा तेलात झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत शेंगदाणा तेलाच्या दरात सुमारे १५ ते २० रुपयांनी दरवाढ झाली, तर सोयाबीन व सूर्यफूल या तेलांच्या दरात प्रतिलिटर सुमारे दहा रुपयापर्यंतची वाढ झाली.

Advertisements

तेलाचे दर प्रतिलिटर
दोन महिन्यापूर्वी म्हणजेच नोव्हेंबरमध्ये सोयाबीन तेलाचे दर १२६ ते १३० रुपये प्रति किलो इतके होते. मात्र जानेवारीत त्यात वाढ होऊन सध्या सोयाबीन तेलाचे दर १३६ ते १४० रुपये प्रति किलोवर पोहोचले. सध्या शेंगदाणा तेल १७० ते १९८ रुपये तर सूर्यफूल तेल १४३ ते १५० रुपये प्रति किलोवर पोहोचले. दरम्यान,
पुढील काही दिवसांत खाद्यतेलाच्या दरात आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now