⁠ 
शनिवार, सप्टेंबर 21, 2024
Home | वाणिज्य | घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ ; वाचा नव्या किंमती

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ ; वाचा नव्या किंमती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२१ । सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सामान्य माणसाला मोठा झटका बसलाय. सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या महिन्यात घरगुती एलपीजी सिलिडरच्या किमती वाढवल्यात. गेल्या १५ दिवसांत विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर ५० रुपयांनी महाग झालेत.

देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) ने विनाअनुदानित १४.२ किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ केलीय. त्याचबरोबर १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत ७५ रुपयांनी वाढ झालीय.

आता दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडर 884.5 रुपये झाला. तर आधी ८५९.५० रुपये मिळत होता. यापूर्वी १८ ऑगस्ट रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. दिल्लीत एलपीजीची किंमत ८३५.५० रुपयांवरून ८५९.५० रुपये करण्यात आली. १५ दिवसांत विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर ५० रुपयांनी महाग झालेत.

जुलै आणि ऑगस्टमध्ये दर वाढले होते. मे  आणि जूनमध्ये घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केला नव्हता. एप्रिलमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात १० रुपयांची कपात केली होती. दिल्लीत यावर्षी जानेवारीत एलपीजी सिलेंडरचा दर ६९४ रुपये होता, जो फेब्रुवारीत वाढवून ७१९ रुपये प्रति सिलेंडर करण्यात आला. १५ फेब्रुवारीला दर वाढवून ७६९ रुपये करण्यात आले. यानंतर २५ फेब्रुवारीला एलपीजी सिलेंडरचा दर ७९४ रुपये करण्यात आला. मार्चमध्ये एलपीजी सिलेंडरची प्राईस ८१९ रुपये केली गेली.

 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.