---Advertisement---
वाणिज्य

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलं ; सहा वर्षानंतर पहिल्यांदाच साखरेच्या दरात झाली मोठी वाढ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२३ । काही दिवसांवरच गणेशोत्सव येऊन ठेपला असून या दरम्यान, गोड मोदकांवर ताव मारणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. साखरेच्या दरात गेल्या दीड महिन्यांत चार रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींचं खर्चाचं बजेट कोलमडलं आहे.

sugar

साखर सध्या प्रति किलो ३७ हजार ७६० रुपये प्रति टनमध्ये विकली जात आहे. मिठाई व्यवसायिक देखील साखरेचा भाव वाढल्याने चिंतेत आहेत. ऑक्टोबर २०१७ नंतर पहिल्यांदाच साखरेच्या दरात एवढी मोठी वाढ झाली आहे. आता पुढचे काही दिवस साखरेचे वाढलेले दर कायम राहणार आहेत. पुढील दोन महिन्यांपर्यंत साखरेचे दर कमी होणार नाहीत, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

---Advertisement---

जून महिन्यापासून साखरेच्या दरात वाढ होण्यास सुरूवात झाली. जूनमध्ये ४२ रुपये प्रति किलो आणि जुलै महिन्यात ४४ रुपये प्रति किलो दराने साखर विकली जात आहे. ऑगस्टमध्येही साखरेचे दर ४४ रुपयांवर स्थिर होते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये साखर ४८ रुपयांपर्यंत पोहचली आहे.

ऊस उत्पादनाचा तुटवडा पडल्याने साखरेचे दर वाढत आहेत. साल २०२३ -२४ मध्ये साखर उत्पादनात घट झाल्यास साखरेचे दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांवर याचा परिणाम होऊ शकतो. मिठाईचे दर देखील यामुळे वाढणार आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---