जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२४ । गेल्या दोन महिन्यांपासून जवळपास स्थीर असलेले सोयाबीन व सूर्यफूल तेलाच्या दरात आठवडाभरापूर्वी पाच रुपयांची वाढ झाली. आता आगामी १५ दिवसांत पुन्हा पाच रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.
घाऊक बाजारात सोयाबीन व सूर्यफूल तेलाच्या प्रती पाऊचचे दर पंधरा दिवसांपूर्वी ९८-९९ रुपये होते. त्यात गेल्या आठवड्यात पाच रुपयांची वाढ होऊन ते १०३ / १०४ रुपयांवर पोहचले आहेत. ते पुन्हा वाढून १०८ / ११०पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. देशाला लागणाऱ्या तेलाची मागणी पूर्ण करण्यासाठी काही प्रमाणात विदेशातून तेलाची आयात केली जाते.
आयात होणाऱ्या तेलाचा पुरवठा २-२ महिने उशिराने होत असल्याने मागणी व पुरवठा यातील साखळी प्रभावित होत असल्याने दरवाढ होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. देशातील तीळ, करडई, मोहरी व शेंगदाणा या तेलवर्गीय बियांचे उत्पादन चांगले असल्याने आपण पूर्णपणे आयात तेलावर अवलंबून नाही. त्यामुळे तेलाचे दर आटोक्यात आहेत. सध्या बाजारपेठेत तेलाच्या मागणीत वाढ झाली आहे