---Advertisement---
भुसावळ

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांच्या कालावधीत वाढ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२३ । सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले असून काही दिवसावर दसरा आणि दिवाळीसारखे सण येऊन ठेपले आहे. याकाळात रेल्वे (Indian Railway) गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. याच पार्श्वभूमीवर सणासुदीच्या दिवसांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

train jpg webp

गाडी क्र. ०१०२५ दादर-बलिया त्रि- साप्ताहिक विशेष गाडी २९ सप्टेंबरपर्यंत होती. ही गाडी आता १ जानेवारी २०२४ पर्यंत तर गाडी क्र. ०१०२६ बलिया-दादर त्रि-साप्ताहिक विशेष ही गाडी दि. २९ सप्टेंबरपर्यंत होती. ती आता १८ ऑक्टोबर ते ३ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू असेल.

---Advertisement---

गाडी क्र. ०१०२७ दादर-गोरखपूर आठवड्यातून ४ दिवस असलेली विशेष गाडी दि. ३० सप्टेंबरपर्यंत होती. ही गाडी आता ३१ ऑक्टोबरपर्यंत, तर गाडी क्र. १०२८ गोरखपूर-दादर आठवड्यातून ४ दिवस असलेली विशेष गाडी दि. ३० सप्टेंबरपर्यंत होती. ती आता १७ ऑक्टोबर ते २ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू असेल.

गाडी क्र. ०११३९ नागपूर-मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष दि. २६ सप्टेंबरपर्यंत होती. ती आता ४ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत, तर गाडी क्र. ०११४० मडगाव-नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी आता दि. ५ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू असेल.

वरील गाड्यांच्या वेळा, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.विशेष रेल्वेगाड्यांच्या विस्तारित फेऱ्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग २४ सप्टेंबर २०२३ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होईल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---