⁠ 
शनिवार, मे 4, 2024

आयकर विभागात पदवी पाससाठी नोकरीची मोठी संधी.. पगार 81,100 पर्यंत

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्ही जर पदवी पास असाल आणि आयकर विभागात नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. आयकर विभाग, मुंबई मार्फत विविध पदांची भरती निघाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2023 आहे. Income Tax Department Bharti 2023

या पदांसाठी होणार भरती?
कर सहाय्यक- 18
हवालदार- 11

भरतीसाठी पात्रता :
कर सहाय्यक-
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष.
हवालदार- कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक किंवा समकक्ष

वेतनश्रेणी :
कर सहाय्यक- 25,500/- ते 81,100/-
हवालदार- 18,000/- ते 56,900/-

वयाची अट : वय 30 नोव्हेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 27 वर्षपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 30 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहाय्यक / सीमाशुल्क उपायुक्त, कार्मिक आणि आस्थापना विभाग, 8वा मजला, नवीन कस्टम हाउस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400001.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा