⁠ 
शनिवार, मे 4, 2024

पाचोरा व भडगाव तालुक्यातील गावांचा पोकरा योजनेत समावेश करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२२ । राज्याचे कृषीमंत्री यांनी मालेगावातील सर्व गावांचा समावेश नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजनेत केला. त्याचप्रमणे पाचोरा व भडगाव तालुक्यातील गावांचाही समावेश करावा. असे मागणीचे निवेदन भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी कृषीमंत्री भुसे यांना पाठवले असून या निवेदनाची प्रत प्रांताधिकारी यांना देखील देण्यात आले. तसेच आमदार किशोर पाटील यांनी देखील अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी करावी असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.

अटल भारतीय जनता पार्टी कार्यालय पाचोरा येथे आयोजित पत्रकार परिषद आयोजित केली त्यावेळी ते बोलत होते. अमोल शिंदे म्हणाले की, जागतिक बॅंकेच्या अर्थसाहाय्याने जळगाव जिल्ह्यासह पाचोरा व भडगाव तालुक्यामध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोखरा) राबविण्यात येत आहे. प्रकल्प शेतकऱ्यांकरीता मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरत असून या प्रकल्पात पाचोरा तालुक्यातील ३१ व भडगाव तालुक्यातील १७ गावे अशा एकूण ४८ गावांचा समावेश या मध्ये आहे. परंतु शेतकऱ्यांशी चर्चा करते वेळी, प्राप्त होणाऱ्या निवेदन व ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार सदरील प्रकल्पात नव्याने गावे समाविष्ट होण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावांचा समावेश पोकरा योजनेत होणे बाबतचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. त्याच पद्धतीने पाचोरा व भडगाव तालुक्यातील उर्वरित सर्व गावांचा देखील समावेश नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजनेत करण्यात यावा अशी मागणी केली.

या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस तथा जि.प.सदस्य मधुकर काटे, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख हिम्मतसिंग निकुंभ, पं.स. सभापती वसंत गायकवाड, पं.स. मा. सभापती व सदस्य बन्सीलाल पाटील, पं.स.सदस्य ज्ञानेश्वर सोनार, सरचिटणीस गोविंद शेलार, नगरसेवक विष्णू अहिरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे, वीरेंद्र चौधरी, योगेश ठाकूर, प्रशांत सोनवणे, मच्छिंद्र पाटील, अमोल नाथ आदी उपस्थित होते.