गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

जून 23, 2026 5:38 PM

सुसज्ज वर्गखोल्या आणि अत्याधुनिक सुविधांवर भर

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उद्घाटन शाळेच्या प्रिन्सीपल निलीमा चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी सर्व शिक्षकवृंद, पालक आणि चिमुकले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

godavari nursing

प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात बालशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया बालवयातच घातला जातो. त्यामुळे नर्सरी स्तरावरील शिक्षण हे मुलांच्या बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. उद्घाटनाचे औचित्य साधून नर्सरी विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करण्यात आले.

तसेच विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. मुलांसाठी सुरक्षित, आनंददायी आणि खेळते शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने शाळेत सुसज्ज वर्गखोल्या, विविध रंगीबेरंगी खेळणी, आधुनिक शैक्षणिक साहित्य आणि अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बांधिलकीचे उपस्थित पालकांनी मनापासून स्वागत करत कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, पालक आणि सर्व सहकार्‍यांचे आभार मानण्यात आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now