मार्तंड हॉस्पिटल क्रिटिकल केअर सेंटरचे थाटात उद्घाटन
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२४ । जळगाव शहरातील डॉ. सौरभ प्रदीप भिरूड व डॉ. सायली पाटील-भिरूड यांच्या मार्तंड हॉस्पिटल क्रिटिकल केअर सेंटरचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. मार्तंड हॉस्पिटलचे उद्घाटन गोदावरी समूहाचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी श्रीमती गोदावरी आजी, मार्तंड भिरूड, चंद्रप्रभा मार्तंड भिरुड यांचे शुभ आशीर्वाद लाभले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, एचडीआयआयएमए महाराष्ट्राचे चेअरमन डॉ.अनिल पाटील, आयएमए चे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.विलास भोळे, एचबीआयआयएमए महाराष्ट्राचे ट्रेझरर डॉ. स्नेहल फेगडे, आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ.सुनील गाजरे, आयएमएच्या जळगाव सचिव डॉ.अनिता भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, शिवसेना नेते विष्णूभाऊ भंगाळे, आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी डॉ. सायली व डॉ.सौरव यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी डॉ.वर्षा पाटील, सौ मंदा व प्रदीप भिरुड, सौ.सुनीता व सतीश महादू पाटील, सौ. सरला व दीपक भिरूड, डॉ. अंजली व डॉ. किरण भिरुड, सौ.जुईली व चेतन अरुण पाटील, श्रीमती ज्योती प्रदीप फालक, डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेजचे रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, आशिष भिरुड, संग्राम सिंह सूर्यवंशी आणि स्नेहजनांची उपस्थिती होती.