⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | मनपा स्तरीय नेहरू हॉकी चषक स्पर्धेत मुलींमध्ये बेंडाळे तर मुलांच्या दोन्ही गटात गोदावरी विजयी

मनपा स्तरीय नेहरू हॉकी चषक स्पर्धेत मुलींमध्ये बेंडाळे तर मुलांच्या दोन्ही गटात गोदावरी विजयी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२२ । श्री.छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या जळगाव शहर महानगरपालिका स्तरीय आंतरशालेय नेहरू हॉकी चषक स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, जळगाव शहर महानगरपालिका व हॉकी जळगावच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या स्पर्धेत १५ वर्षातील मुलांच्या स्पर्धेत गोदावरी इंग्लिश स्कूल विजयी तर विद्या इंग्लिश स्कूल उपविजेते ठरले,१७ वर्षे मुलांच्या गटात गोदावरी स्कूल विजयी तर अँग्लो उर्दू हायस्कूल उपविजय ठरले, १७ वर्षा आतील मुलींच्या गटात जी डी बेंडाळे महाविद्यालय विजयी तर गोदावरी इंग्लिश स्कूल उपविजे ठरले.

या स्पर्धेचे उद्घाटन जळगाव शहर महानगरपालिकेचे नगरसेवक तथा कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू नितीन बरडे यांच्या शुभहस्ते व हॉकी महाराष्ट्राचे फारुख शेख यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्यक्ष हॉकी खेळून उद्घाटन करण्यात आले. या क्रीडा महोत्सवाचे पारितोषिक वितरण समारंभासाठी महिला बचत गटाच्या तथा महाराष्ट्र राज्याच्या बेटी बचाव बेटी पढाव च्या माजी समन्वयक प्राध्यापिका डॉक्टर अस्मिता पाटील यांच्या शुभहस्ते व जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी विशेष उपस्थिती म्हणून हॉकी महाराष्ट्राच्या डॉक्टर अनिता कोल्हे, हॉकी जळगाव चे प्रमुख फारुख शेख, क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर, स्पर्धेचे क्रीडा समन्वय सय्यद लियाकत अली, गोदावरीचे क्रीडा संचालक आसिफ खान, अँग्लो चे वसीम मिर्झा, बेंडाळे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका छाया चिरमाडे आदींची उपस्थिती होती

विजयी व उपविजयी संघातील खेळाडूंना सुवर्ण व रजत पदक तसेच विजयी व उपविजेते संघास नेहरू चषक स्पोर्ट्स हाऊस जळगाव तर्फे देण्यात आले तर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांनी शासकीय प्रमाणपत्र दिले.

स्पर्धेचा निकाल
१५ वर्षाआतील मुले

उपांत्य सामना
विद्या इंग्लिश स्कूल वी वी अंगलो उर्दू स्कूल (१-०)

अंतिम सामना
गोदावरी इंग्लिश स्कूल वी वी विद्या इंग्लिश स्कूल (४-०)

१७ वर्षाआतील मुले

उपांत्य सामना
अंग्लो उर्दू स्कूल वी वी विद्या इंग्लिश स्कूल (१-०)
गोदावरी इंग्लिश स्कूल वी वी मिल्लत उर्दू स्कूल (३-०)

अंतिम सामना
गोदावरी स्कूल वी वी अँग्लो उर्दू स्कूल (१-०)

१७वर्षाआतील मुली
गोदावरी स्कूल वी वी अँगलो उर्दू स्कूल (१-०)
बेंडाळे कॉलेज वी वी विद्या इंग्लिश स्कूल (१-०) पेनोल्टी

अंतिम सामना
बेंडाळे कॉलेज वी वी गोदावरी स्कूल (२-०) पेनल्टी

स्पर्धा यशस्वीतेसाठी कार्यरत पंच
स्पर्धेत पंच म्हणून लियाकत अली, शादाब सय्यद, मुझफ्फर शेख, इम्रान शेख, चेतन माळी, धीरज जाधव, दिनेश ओडिया, इद्रिस शेख, दिवेष चौधरी यांनी काम केले

author avatar
टीम जळगाव लाईव्ह