जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२२ । विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालयतर्फे वसंत पंचमी उत्सवानिमित्त श्री.सरस्वती पूजन व वाद्य पूजन कार्यक्रम नुकताच संगीत विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. त्यात ज्येष्ठ संगीत शिक्षिका प्रांजली रस्से व विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम विभागाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री सरस्वती आणि विविध वाद्यांचे पूजन करण्यात आले. प्रतिष्ठानच्या संगीत विभागाचे प्रमुख किरण सोहळे यांनी प्रास्ताविकाद्वारे वसंत पंचमी हा दिवस वाग्देवी भगवती सरस्वतीचा जन्मदिवस म्हणून संपूर्ण विश्वात साजरा केला जातो. संगीत क्षेत्रात या दिवसाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या निमित्ताने हा कार्यक्रम प्रतिवर्षी प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात येतो, अश्या शब्दांत कार्यक्रमाचे महत्त्व विशद करुन उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी नृत्य शिक्षिका शिवानी जोशी – पाठक यांच्या विद्यार्थीनींनी कथ्थक नृत्याद्वारे सरस्वती वंदना सादर केली. डॉ.अविनाश आचार्य विद्यालयाच्या बाल विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात भूप रागाचे सरगम गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. इंग्लिश मीडियम विभागातील विद्यार्थिनींनी ‘राग गौड मल्हार’ ची सुरेल बंदिश आलाप, ताना सादर करून रसिकांची मने जिंकली. प्रतिष्ठानच्या संगीत विभागातील सर्व शिक्षकांनी मिळून राग बसंत बहार वर आधारित ‘माँ बसंत आयोरी’ ही पारंपरिक बंदिश सादर करून कार्यक्रमात रंग भरला. ज्ञानेश्वर पाटील यांनी संगीत विद्यालयाच्या औचित्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करत वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रांजली रस्से यांनी खान्देशातील संगीत कलेच्या उपासकांसाठी एक हक्काचे व्यासपीठ म्हणून संगीत विद्यालय कार्यरत असल्याचे भावोद्गार काढले तसेच वसंत पंचमी चे संगीत क्षेत्रात असलेले महत्त्व विषद करून एका अर्थाने संगीत कलेचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला. कार्यक्रमाच्या समारोपात संगीत शिक्षिका शितल सोनवणे यांनी ऋणनिर्देश केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीत शिक्षक विजय पाटील यांनी केले.
याप्रसंगी केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील, प्रा.डॉ.विद्या पाटील, ललित कला संवर्धिनीचे पियुष रावळ, योगिता शिंपी, दिनेश ठाकरे, गणेश पाटील व किर्ती बु-हानपूरकर या मान्यवरांसह संगीत क्षेत्रातील जाणकार रसिक श्रोते, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व संगीत शिक्षक व शिक्षकेतर बंधूंचे सहकार्य लाभले.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत ‘भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन
- मुक्ताईनगरमध्ये लागणार धक्कादायक निकाल; संभाव्य आमदार कोण? पाहा..
- उमेदवारांनो मुंबई गाठा! निकलाआधी शरद पवारांच्या महत्त्वाच्या सूचना, वाचा काय आहेत?