⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

रांजणगावमध्ये अज्ञाताने मजुराची दुचाकी लांबवली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे एका मजुराने घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञाताने लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी येथील ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील रांजणगाव येथे अलिम टकारी (वय ३७) आपल्या परिवारासह वास्तव्यास असून रोजंदारीवर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. दरम्यान टकारी यांनी काल रात्री नेहमीप्रमाणे आपली दुचाकी (क्र. एम.एच १९ डीएक्स ६५१७) घरासमोर उभी केली. आज सकाळी पहाटे ४ वाजताच्या सुमारास टकारी हे लघुशंकेसाठी घराबाहेर आले असता त्यांना मोटारसायकल मुळ ठिकाणी दिसून आली नाही. त्यावर त्यांनी परिसरासह नातेवाईकांकडे शोधाशोध केली. मात्र ६० हजार रुपये किंमतीची हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची दुचाकी मिळून आली नाही. त्यावर टकारी यांनी लागलीच ग्रामीण पोलीस स्थानक गाठून भादवी कलम-३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले. तत्पूर्वी आठ दिवसांपूर्वीच बोढरे शेत शिवारातून एका शेतकऱ्याची दुचाकी अज्ञाताने लांबविल्याची घटना घडली होती. सदर घटना ताजी असताना पुन्हा हि घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी काही उपाययोजनांची गरज असल्याची माहिती काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.