⁠ 
शनिवार, जून 15, 2024

पर्यावरण वाचवण्यासाठी जिल्ह्यातील ‘ही’ व्यक्ती सायकलने करणार तब्बल इतका प्रवास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२३ | जळगाव जिल्ह्यातील रहीवासी असलेले बुधगावचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उर्वेश साळुंखे यांनी पर्यावरण वाचवा हे अभियान सुरु केले आहे. या अभियानावेळी साळुंखे सायकलवर प्रवास करणार असुन ३० हजार नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करणारं आहेत. (harshal salunke jalgaon)

ह्या अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रवादीचा हात, पर्यावरणाला साथ ह्या उपक्रमाची संकल्पना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे व मा. जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी ,जळगाव सुनील पाटील यांची होती.

या प्रसंगी माजी मंत्री अरूणभाई गुजराती, गुलाबराव देवकर, अमळनेरचे आमदार अनिल पाटील, माजी आमदार कैलास पाटील, आमदार साहेबराव पाटील, चो‌.का.सा. माजी चेअरमन घनश्याम पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण,राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग प्रदेश समन्वयक रिता बाविस्कर सभापती डि.पी. साळुंखे , राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मनोज पाटील, युवक अध्यक्ष दिपक सोनवणे, वलय पाटील, हर्षल साळुंखे उपस्थित होते.