जळगाव जिल्हा

जीवाचे रान करून पिकवलेला माल बाजारात आणला पण.. जळगावच्या संतप्त शेतकऱ्याने पुढे काय केलं वाचा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२३ । जीवाचे रान करून शेतकरी शेतमाल पिकवितो. मात्र बऱ्याच वेळा योग्य भाव मिळत नसल्याने हताश होऊन पिकविलेला माल फेकण्याची वेळ येते. असाच प्रकार जळगावमध्ये घडला आहे. कष्टानं पिकवलेल्या भाजीला कवडीमोल भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यानं भाजी थेट रस्त्यावर फेकल्याचं चित्र जळगावमध्ये पाहायला मिळालं.

गेल्या महिनाभरापासून जळगाव जिल्ह्यात पाऊस नसतानाही मोठ्या अडचणीचा सामना करत शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवला. त्यानंतर भाजीपाला पिकवून बाजारात आणला. मात्र बाजार समितीमध्ये केवळ पाच रुपये किलो दराने भाजीपाला विकला जात आहे. यामध्ये खर्चही निघत नसल्याने काही शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकून देत आपला संताप व्यक्त केला आहे.

मातीमोल भाव मिळाल्याने टोमॅटो, गिल्के, वांगी, दोडके, मिरच्या, गंगाफळ आदी भाज्या फेकून दिल्या. दरम्यान, भाज्यांची वाढलेली आवक आणि ग्राहक नसल्याने भाव पडल्याचं व्यापारी सांगत आहेत.

पाऊस नसताना ही शेतमालाची मोठी आवक वाढली असताना ही भाजी खरेदी करण्यासाठी बाजारात ग्राहक नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहेत. जळगाव बाजार समित्यासह किरकोळ बाजारात सर्वच भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. भाजीपाल्याचे दर निम्म्याहूनही खाली उतरल्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. मोठ्या कष्टानं सगळ्या संकटातून सावरत पिक उभं केलं आणि त्याला कवडीमोलही भाव मिळत नसल्यानं शेतकरी निराश झाला आहे. शेतकऱ्यानं भाजी रस्त्यावर फेकून संताप व्यक्त केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button