जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२। येथील आयएमआर महाविद्यालयात नुकताच वार्षिक महोत्सव सिनर्जी-२०२२ चा रक्तदान, बक्षीस वितरण कार्यक्रमाने समारोप झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून केसीई सोसायटीचे खजिनदार दि. टी. पाटील, संस्थेचे माजी विद्यार्थी तथा उद्योजक नंदू अडवाणी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालिका प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे ह्या होत्या. व्यासपीठावर अकॅडमिक डीन प्रा. तनुजा फेगडे उपस्थित होत्या. प्रा. बेंडाळे यांनी सांगितले की, कलेच्या उपासनेतून माणसाला खरा आनंद मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने एक तरी कला प्रकार छंद म्हणून जोपासला पाहिजे. प्रा. उत्कर्ष राणे व अंकिता दहाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. तनुजा फेगडे यांनी आभार मानले. रक्तदान शिबिरात महाविद्यालयाच्या सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सहकार्य लाभले. औपचारिक कार्यक्रमानंतर बक्षीस वितरण करण्यात आले.