⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगाव महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. याबाबत निघाले आदेश

जळगाव महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. याबाबत निघाले आदेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२३ । तुम्हीही जळगाव महापालिकेतील कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना कामावर येताना हेल्मेट वापरण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. त्याबाबतची अमंलबजावणी सुरू झाली आहे.

महापालिका आस्थापना विभागाकडून याबाबतचे आदेश काढण्यात आल्याने काहींनी त्यांची अंमलबजावणी देखील केली. राज्य शासनाकडून वाहनधारकांना हेल्मेट वापरण्यासंदर्भात आवाहन करून प्रत्येक जिल्ह्यातील आरटीओ विभागाला तशा सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्याच धर्तीवर महापालिकेने देखील वाहनधारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मनपाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हेल्मेट वापरण्याबाबत आदेश जारी केले आहेत.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरुन दुचाकी वाहनधारकांनी हेल्मेट घालून सुरक्षित प्रवास करावा. ड्युटीवर येतानादेखील हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले आहे. त्याची अमलबजावणी सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी काही मनपा कर्मचारी वाहनावर येताना हेल्मेट घालून महापालिकेत आले असल्याचे दिसून आले. हेल्मेट न वापरणाऱ्यावर कारवाईचा बडगा महापालिकेने अद्याप उगारलेला नाही.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.