---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र

शिवसेना आमदार अपात्रतेबाबत कोर्टाचे महत्वाचे निर्देश ; विधानसभा अध्यक्षांना झाप झाप झापलं..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२३ । शिवसेना आमदार अपात्रेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावली पार पडली. आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीला होत असलेल्या दिरंगाईबाबत न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना कडक शब्दांत सुनावलं आहे.

suprim court

आमदार अपात्र प्रकरणात अजूनही कुठलीही कारवाई झाली नाही, याबाबत कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. निर्णय घेण्याचे सर्वाधिकार अर्थातच अध्यक्षांकडे आहेत. परंतु, 11 मे रोजी या संपूर्ण प्रकरणातील निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आणि अपात्रतेचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार अध्यक्षांकडे सोपवले होते, याला तब्बल पाच महिने उलटून गेले आहेत.

---Advertisement---

परंतु, पाच महिन्यांनंतरही अपात्रतेची सुनावणी वेगानं पुढे का जात नाही? याबाबत ताशेरे ओढत आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं अत्यंत कडत शब्दांत विधानसभा अध्यक्षांना सुनावलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं निर्देश दिल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांची भूमिका काय असणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, यावेळी अपात्रता प्रकरणावरील सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठरवलेल्या वेळापत्रकावरही सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढले आहेत. कायदा तुम्हाला बसवून शिकवावा लागेल. मंगळवारी (17 ऑक्टोबर) विधानसभा अध्यक्षांनी नवं वेळापत्रक सादर करावं. जर निश्चित वेळापत्रक अध्यक्षांकडून येऊ शकलं नाहीतर मात्र नाईलाजास्तव सर्वोच्च न्यायालयाला विशिष्ट टाईमलाईन आखून द्यावी लागेल. दोन महिन्यांची टाईमलाईन असून शकते, ज्यामध्ये अध्यक्षांना बंधनकारक असेल, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---