⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | पाटील महाविद्यालयात लसीकरणाला उस्फुर्त प्रतिसाद

पाटील महाविद्यालयात लसीकरणाला उस्फुर्त प्रतिसाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२२ । एरंडोल शहरातील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालयात १५ ते १८ वर्ष वयोगटातील इयत्ता अकरावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात ७५ टक्के लसीकरण पूर्ण झाले.

महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील, प्राचार्य एन.ए.पाटील उपप्राचार्य, आर.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संवाद साधून सदर शिबिर बाबत जनजागृती केली होती. तसेच शिबिराला माजी उपनगराध्यक्ष किशोर निंबाळकर यांनी सदिच्छा भेट देऊन विचारपूस केली.

शिबिरासाठी एरंडोल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुनम धनगर यांच्या पथकाने लसीकरण, विद्यार्थ्यांना लसीबाबत माहिती दिली व विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन देखील करून दिले.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह