जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२१। महानगरपालिका रस्ते, गटारी, स्वच्छता यासारख्या सुविधा देण्यास असमर्थ ठरली आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठ्या कटू प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत मनपा प्रशासनाने आणलेला करवाढीचा प्रस्ताव जनतेवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे करवाढ रद्द करून, करात ५० टक्के सूट द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आयुक्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
महापालिका प्रशासनाकडून कारयोग्य मूल्य निश्चितीबाबत विशेष नोटीस प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यात दर्शविलेले वाढीव कर व इतर आकार हे अवाजवी व मनमानी पद्धतीने असून घरपट्टी करवाढ ही सर्वसामान्य जळगावकरांना अवाजवी आहे. महापालिका सर्वसामान्य जनतेला कोणत्याही सोईसुविधा पुरविण्यात असमर्थ ठरलेली आहे. सध्याच्या परिस्थितीत आरोग्य, रस्ते, स्वच्छता, गटारी ह्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झालेले असून नागरिकांना यामुळे मोठ्या प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. अश्या परिस्थितीत कारवाढीचा प्रस्ताव जनतेवर अन्याय करणारा आहे. कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती ढासळलेली असतांना त्यांच्यावर करवाढ न करता त्यांना ५० टक्के करमाफी देऊन दिलासा दिल्यास एक चांगला संदेश महाराष्ट्रात जाईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आंदोलनाचा इशारा
मनपा प्रशासनाने करवाढ तात्काळ रद्द करून करात ५० टक्के सूट द्यावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, जिल्हा सचिव भरत मोरे, तालुका अध्यक्ष रमाताई ढिवरे, कार्याध्यक्ष सागर सपकाळे, महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, युवक अध्यक्ष मिलिंद सोनवणे, मनोहर इंगळे, नरेंद्र मोरे, अनिल लोंढे, भीमराव सोनावणे, शांताराम आहिरे, संदीप तायडे, हरीश शिंदे, विशाल महाले, सागर पवार, चंद्रकांत हातागडे, सागर गायकवाड, अक्षय मेघे, शेखर सोनवणे, अविनाश पारधे, शाहरुख पटेल, अक्षय मोरे, हितेश कोळी, अक्षय बोदडे, प्रफुल्ल वानखेडे, मानव गायकवाड, सागर खैरनार, विक्की आहिरे, आकाश नाईक, अजय अडकमोल, वशिम पटेल, बंटी निकम आदींच्या सह्या आहेत.
आंदोलनाचे प्रक्षेपण :
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/1534733753528280