⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | हवामान | IMD Alert : ‘असानी’च्या प्रभावामुळे जळगावसह ‘या’ भागात पावसाची शक्यता

IMD Alert : ‘असानी’च्या प्रभावामुळे जळगावसह ‘या’ भागात पावसाची शक्यता

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२२ । बंगालच्या उपसागरात तयार झालेलं ‘असानी’ चक्रीवादळ हे उत्तर आंध्र प्रदेश व ओडिशा किनारपट्टीलगच्या भागात आज सायंकाळी धडकणार आहे. चक्रीवादळाबाबत (Asani cyclone) अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात संमिश्र वातावरण गेल्या आठवड्यात बघायला मिळालं. हवामान खात्याने पुणे शहरात मंगळवार आणि बुधवारी हलक्या तीव्रतेचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे, धुळे, जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर, कोल्हापूरसह कोकणात पावसाचा अंदाज वर्तवला (IMD Alert) आहे.

मागील काही दिवसापासून राज्यातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहे. राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशावर गेला आहे. तर राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे झाली आहे. त्यामुळे जळगावमध्ये वाढत्या तापमानाने जळगावकर होरपळून निघत आहे. दरम्यान, वाढत्या उन्हातून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही भागांत पुढील तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

10 ते 13 मे रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर 13 मे रोजी पुणे, धुळे, जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड आणि अहमदनगर या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय 11 ते 13 मे दरम्यान मुंबई, परभणी, कोल्हापूर आणि सातारा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ सध्या अंदमान निकोबार बेटांपासून 270 किलोमीटर, पोर्टब्लेअरपासून 450 किमी, तर आंध्रप्रदेश आणि पुरीपासून 610 किमी अंतरावर खोल समुद्रात आहे. मंगळवारी (दि.10) सायंकाळी हे चक्रीवादळ उत्तर आंध्रप्रदेश आणि ओदिशाच्या किनारपट्टीवर पोहोचणार आहे.

दरम्यान, ‘असानी’च्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये (Visakhapatnam) मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं असून ओडिशा ते आंध्र प्रदेश सरकार असानीबाबत हाय अलर्टवर आहेत. चक्रीवादळामुळे समुद्रातील हालचाली तीव्र होत असताना मच्छिमारांना काही दिवस किनाऱ्यापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.