---Advertisement---
हवामान

नागरिकांनो काळजी घ्या! जळगावात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२३ । राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाल्याचे दिसत आहे. मुंबईतल्या कुलाबा येथील प्रादेशिक हवामान विभागाने राज्यातील बहुतांश भागात पावसाचा इशारा देण्यात आला. यात उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा असून जळगाव जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असे हवामान खात्याने सांगितले आहे.

rain 1 2 jpg webp

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भ आणि तळ कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वारे, ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तर हवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देखील जारी केला आहे.

---Advertisement---

आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदूरबार, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असे हवामान खात्याने सांगितले आहे.

तर, आज जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये आज ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार किंवा हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज हवामान खात्याकडून सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

जळगांव जिल्हा ???????? दि13/ 07/2023
बोदवड-28
भडगाव-6
भुसावळ-27.2
पारोळा-6
जामनेर-37
चोपडा-2
चाळीसगाव-26
रावेर-48
मुक्ताईनगर-22
धरणगाव-4
यावल-76
एरंडोल-1
जळगाव-12

IMD

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---