जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२२ । रावेर महसूल पथकांची दबंग कामगिरी अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केल्याने अवैध गौण खनिजाची वाहतूक करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. भातखेडानजीक असलेल्या मुरूमाच्या खदानीतून दररोज मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिजाची वाहतूक होत असताना कारवाई होत नसल्याने संबंधितांचे फावले आहे.

तालुक्यातील उटखेडा-भातखेडा रस्त्याने असलेल्या खदानीतून सायंकाळी अवैध गौण खनिजची वाहतूक होत असल्याची माथहती महसूल पथकाला कळाल्यानंतर पथकाने ट्रॅक्टर (एम.एच.19 डी.व्ही.5786) ताब्यात घेतले. या ट्रॅक्टरमध्ये विना परवाना गौण खनिजाची वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाल्याने ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. ही कारवाई उटखेडा रोडवर मंडळाधिकारी मीना तडवी, मंडळ अधिकारी विठोबा पाटील, तलाठी गुणवंत बारेला, रावेर तलाठी स्वप्निल परदेशी, सहस्त्रलिंग तलाठी अंजुम तडवी, सावखेडा तलाठी निलेश चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.