गुन्हेरावेर

धक्कादायक : तलाठी, कोतवालला धक्काबुक्की, शिवीगाळ करीत तहसीलमधून पळविले ट्रॅक्टर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांनी उच्छाद मांडला. अशात अवैध वाळू वाहतूक प्रकरणी जप्त केलेले ट्रॅक्टर रावेर तहसील कार्यालयाच्या आवारातून पळवून नेल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेत तलाठी दादाराव कांबळे व कोतवाल गणेश चौधरी यांना ट्रॅक्टर मालकाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व धक्काबुक्की केली. या प्रकरणी रावेर पोलिसांत चोरी व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला.

रसलपूरकडून रावेरच्या दिशेने वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर येत असल्याची माहिती तलाठी कांबळे यांना मिळाली. तलाठी कांबळे व कोतवाल गणेश चौधरी यांनी नागझिरी भागात जाऊन येणाऱ्या ट्रॅक्टरला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, चालकाने न थांबता मदिना कॉलनीत ट्रॅक्टर पळवून नेले. नंतर महसूलच्या या कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टरचा पाठलाग केला. मात्र, चालकाने चालू स्थितीत ट्रॅक्टर सोडून पळ काढला. नंतर ट्रॅक्टर मालक शेख सलमान शेख हसन (रा.इमामवाडा) व त्याचा भाऊ सुपड्या शेख हसन हे तेथे आले. त्यांनी कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ व धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणला. दरम्यान, या घटनेमुळे शहर आणि तालुक्यात गौणखनिज माफियांच्या दादागिरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकारावर नियंत्रणासाठी ठोस कारवाईची आवश्यकता आहे.

तिघांविरूद्ध गुन्हा दाखल
या प्रकारामुळे घटनास्थळी मोठा जमाव जमला. ही माहिती मिळताच तहसीलदार उषाराणी देवगुणे या पोलिसांना घेवून मदिना कॉलनी गाठली. नंतर ट्रॅक्टर जप्त केले. हे ट्रॅक्टर दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात लावले होते. मात्र, आरोपींनी ट्रॅक्टर पळवून नेण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी ट्रॅक्टर मालक शेख सलमान शेख हसन, त्याचा भाऊ सुपड्या शेख हसन व अज्ञात चालक अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button