⁠ 
रविवार, जानेवारी 5, 2025
Home | गुन्हे | जळगाव तालुक्यात अवैध दारूभट्ट्या उद्ध्वस्त; सव्वा पाच लाखाचा मुद्देमाल जप्त

जळगाव तालुक्यात अवैध दारूभट्ट्या उद्ध्वस्त; सव्वा पाच लाखाचा मुद्देमाल जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२४ । जळगाव जिल्ह्यात अवैध धंदे जोमाने सुरु असून अशातच राज्य उत्पादन शुल्क विभागाने जळगाव तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांसह अवैधरित्या सुरू झालेल्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाईत सुमारे ५ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात दारूबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणाव अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाईला सुरूवात केली आहे. या अनुषंगानेविविध भरारी पथकाने जळगाव तालुक्यातील देवूळवाडी, भोलाणे आणि इतर भागात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर धडक मोहिम राबविण्यात आली. यात परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूच्या भट्ट्या देखील उध्दवस्त करण्यात आले.

ही कारवाई राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधिक्षक डॉ. व्ही.टी.भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत ५ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात दारूबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.