---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे चोपडा

चोपडा तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२३ । चोपडा तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्रातील देवझिरी – हंड्याकुंडया – पाटी रस्त्यावरील वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोड आढळून आली आहे. या परिसरात सशस्त्र जवानांची गस्त वाढवाण्यात आली असून अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा चोपड्याचे सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांनी दिला आहे.‌

vruksh tod jpg webp webp

देवझिरी वनक्षेत्रपाल जी. आर. बडगुजर हे हांड्याकुंड्या कॅम्प मधील जवान, वनमजुर, वनसेवक, यांच्यासह देवझिरी-हंड्याकुंडया-पाटी रस्त्याने पेट्रोलींग करत असतांना हंड्याकुंड्या नाल्या पासून पूर्वेस ४०० मीटर अंतरावरील वनखंड क्र. १६६ क्षेत्रावर तीन ठिकाणी अवैध ताजी वृक्षतोड आढळून आली आहे. या अवैध वृक्षतोडीत साग लाकडासह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची २ लाख ६६ हजार ८५३ इतकी किंमत आहे.

---Advertisement---

वनखंड क्रं. १६६ हे देवझिरी वनक्षेत्रास १५ ते १६ किलो मोटरची उत्तरेस मध्यप्रदेशची सीमा असून नियतक्षेत्र देवझिरी पूर्व मधील घटनास्थळा पासून‌ सुमारे ४०० मीटर अंतरावर उत्तरेस मध्यप्रदेशची सीमा असल्याने आरोपींना पसार होण्यास अथवा पळून जाण्यास सोयीच होते.

अवैध वृक्षतोडीची पाहणी केली असून आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. भविष्यात पुन्हा असा गुन्हा होणार नाही. याकरिता कठोर कार्यवाही केली जाईल. वन गुन्ह्यांचा हा प्रकार अवैध वृक्षतोड तस्करी व अवैध अतिक्रमण रोखण्यात आल्यामुळे सुडबुध्दीने केल्याचे दिसून येत आहे. या गुन्हयाची सखोल चौकशी व आरोपीचा शोध यावल उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी देवझिरी व वनपाल देवझिरी हे करत आहे. अवैध वृक्षतोड परिसरात राज्य राखीव पोलीस दलाचे गट क्र. ६ चे सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहेत. असे ही श्री हाडपे यांनी सांगितले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---