गुरूवार, जून 8, 2023

12वीचा निकाल थोड्या वेळात, विध्यार्थ्यांनो बोर्डाची वेबसाइट हॅंग झाल्यास ‘हा’ आहे पर्याय

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२३ । राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज गुरुवारी (दि.२५) दुपारी दोन वाजल्यापासून ऑनलाइन जाहीर होईल. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. निकालासाठी आता अवघे मिनिट उरले आहे.

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी त्यांचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. मात्र निकाल जाहीर होताच लाखो विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून निकाल तपासण्याचा प्रयत्न करतील. अशा परिस्थितीत सर्व्हर डाऊन किंवा वेबसाइट क्रॅशची समस्या आल्यास विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनाही एसएमएसद्वारे निकाल पाहता येणार आहे.

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवरून एसएमएस पाठवावा लागेल. SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जाऊन आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.

ऑनलाईन असा चेक कराल निकाल?
विद्यार्थी प्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट Maharesult.nic.in किंवा hscresult.mkcl.org जावे.
यानंतर होम पेजवर दिलेल्या “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 12वी निकाल 2023” या लिंकवर क्लिक करा.
आता तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
तुम्ही तुमच्या निकालाची प्रत डाउनलोड करून मुद्रित केली पाहिजे आणि भविष्यातील संदर्भासाठी ती तुमच्याकडे ठेवा.