जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२२ । “करोनाच्या काळात ‘मी आणि नथुराम’ प्रकाशित झालं होत. ‘मी नथुराम गोडसे’ नाटक करत असताना बाळासाहेब ठाकरे ठामपणे नथुरामच्या पाठीशी उभे राहिले होते. १७ जुलै १९९८ रोजी त्यांनी ‘नथुराम बोलला तर काँग्रेसच्या पोटात का दुखतं?’ असा अग्रलेख ‘सामना’त लिहिला होता. तो अग्रलेख या पुस्तकात छापण्यात आला आहे”. त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आजचे प्रमुख म्हणजे एकनाथ शिंदे असे शरद पोंक्षे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘रंगात रंगली दिवाळी’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाला उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ‘रंगाई’ या खास दिवाळी अंकाचं देखील प्रकाशन करण्यात आलं.
यावेळी पोंक्षे म्हणाले कि, खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत. पुस्तकात आनंद दिघे कसे पाठीशी उभे राहिले, बाळासाहेबांनी ती लढाई कशी लढली आणि आमचं नाटक केंद्र सरकारविरोधातील लढाईत कसं जिंकलं याचे अनंत किस्से आहेत.