⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | सामाजिक | वर्ल्डकपच्या सेमी – फायनलमध्ये पाऊस पडला तर ? वाचा नवीन नियम

वर्ल्डकपच्या सेमी – फायनलमध्ये पाऊस पडला तर ? वाचा नवीन नियम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । २० वर्ल्डकपच्या दोन्ही सेमी फायनल्समध्ये जर पाऊस पडला तर काय होणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र आता आयसीसीने नवीन नियम बनवले आहेत. सेमी फायनलमध्ये जर पाऊस पडला, तर काही काळ वाट बघितली जाईल. पाऊस थांबल्यावर पंच हे मैदानाची पाहणी करतील आणि त्यानंतर हा सामना किती षटकांचा खेळवायचा याचा निर्णय घेतला जाईल. पण जर पाऊस पडतच राहीला तर मात्र हा सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाऊ शकतो.

सेमी फायनलसाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. पण या राखीव दिवशीही पाऊस पडला तर काय होणार, याचाही नियम आयसीसीने बनवला आहे. जर राखीव दिवशीही पाऊस पडला तर मात्र गुणतालिका पाहिली जाईल. गुणतालिकेत ज्या संघाचे जास्त गुण. त्यांना विजयाची संधी मिळणार आहे.

अश्या नियमानुसार जर इंग्लंड पहिल्या स्थानावर राहिला असता तर त्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश असता. पण भारताने झिम्बाब्वेवर विजय साकारला आणि त्यांना मागे सारत आता गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. कारण विजयानंतर सहा गुण झाले होते. पण त्यानंतर भारताने विजय साकारला आणि त्यांचे आठ गुण झाले त्यांनी आता गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. जर भारताला इंग्लंडच्या संघाशी दोन हात करावे लागणार आहेत. त्यामुळे भारताला सेमी फायनलमध्ये जिंकण्याची संधी जास्त असल्याचे म्हटले जात आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह