जळगाव लाईव्ह न्यूज । जाफर मन्यार । बोदवड येथे इस्लामी पद्धतीने नुकतेच दोन आदर्श विवाह पार पडले. ‘त्या’ विवाहाने गावकऱ्यांचे डोके अभिमानाने उंच केले असून या विवाहाचे शहरात कौतुक होत आहे.

बोदवड शहरातील रहिवासी शेख आरिफ शेख हुसेन मणिहार यांच्या मुली (एक) तंजीम बी शेख आरिफ मणिहार आणि शेख मुस्ताक शेख मुख्तार यांचा कसारा नशिराबाद (दोन ) तरन्नुम जहाँ शेख आरिफ मणिहार आणि शेख नदीम शेख निजामुद्दीन मन्यार जळगाव, मौलाना कलीम शेख हसन मणियार याच्यासोबत लग्नासाठी बोलणं सुरू होते. शेख करीमचा विवाह शेख हकीम जळगाव यांच्याशी व्हावा, परंतु सर्व विधी सोडून इस्लामी पद्धतीने करावा, अशी भूमिका दोघांनी मांडली असता त्यांना दोन्ही बाजूंनी संमती दिली. अत्यंत साधेपणाने हा विवाह मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला असून शतकानुशतके लोकांसाठी उदाहरण बनलेल्या इस्लामी पद्धतीच्या साधेपणापासून लोकांनी शिकले पाहिजे. ज्यामध्ये भ्रष्ट समाजाची हुंड्याच्या शापातूनही सुटका होईल, तसेच मुलींची संख्या सतत कमी होत आहे समाजातही आळा बसेल.
या प्रसंगी रफिक मणियार , युनूस मणियार, कलीम मौलाना, मेहबूब मौलाना, हसन मणियार, जिलानी मणियार, छायाचित्रकार , पत्रकार जाफर मणियार, आमेन टेलर शेख चांद, शकील मणियार, शरीफ मणियार, इरफान बागवान, रईस कासार जळगाव, डॉ. मुनीर जळगाव, आसिफ मणियार, शकील मणियार, अब्दुल्ला मणियार, कयूम मणियार, आसिफ मणियार, जिया शेख, सलीम कुरेशी, लतीफ शेख, मुझम्मिल शहा नगरसेवक आदी उपस्थित होते.
- डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सी.बी.एस.ई स्कूल सावदाचे 10वी, 12वी निकालात यश
- यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना उत्साहात
- सोयाबीन : घरचे वाण, उतारही देई छान!
- भुसावळातील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सी.बी.एस.ई स्कूलचे 10वी, 12वी निकालात यश
- जळगाव जिल्ह्यात दोन ठिकाणी वीज कोसळली; महिलेचा मृत्यू, शेतमजूर जखमी