ग्रॅज्युएट्स उत्तीर्णांना सरकारी बँकेत नोकरीची मिळविण्याची शेवटची संधी..

IDBI Bank Recruitment 2023 : बँकेत (Sarkari Nokari) नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे IDBI बँकेत काही पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाइट idbibank.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2023 आहे. IDBI Bank Bharti 2023

एकूण पदसंख्या : 600

या पदासाठी होणार भरती?
असिस्टंट मॅनेजर या पदासाठी ही भरती होणार आहे.

काय असणार पात्रता?
उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा. तसेच बँकिंग वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रात 02 वर्षे अनुभव आवश्यक

वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी ₹1000/-  [SC/ST/PWD: ₹200/-]
वेतनश्रेणी : मूळ वेतन 36000-1490(7)-46430-1740(2)-49910-1990(7)-63840(17 वर्षे) या वेतनश्रेणी अंतर्गत सुरुवातीला रु.36,000/- दरमहा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 मार्च 2023

नवीन जाहिरात : PDF

अधिसूचना पहा : PDF
Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा