⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

ग्रॅज्युएट्स पाससाठी सुवर्णसंधी! IDBI बँकेत 2100 पदांसाठी बंपर भरती जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । ग्रॅज्युएट्स पाससाठी IDBI बँकेत नोकरीची मोठी संधी आहे. IDBI बँकेने विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली असून त्यानुसार भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 22 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची तारीख ६ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. IDBI Bank Bharti 2023

या भरतीद्वारे एकूण 2100 पदे भरली जाणार आहे. यात ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) पदाच्या 800 जागा रिक्त आहेत. तर एक्झिक्युटिव- सेल्स & ऑपरेशन्स (ESO) पदाच्या 1300 जागा भरल्या जातील.

शैक्षणिक पात्रता:
ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]
एक्झिक्युटिव- सेल्स & ऑपरेशन्स (ESO) – कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट: 01 नोव्हेंबर 2023 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

वयोमर्यादा: या पदांसाठी वयोमर्यादा किमान 20 वर्षे आणि कमाल 25 वर्षे असेल. तुमचा जन्म 2 नोव्हेंबर 1998 पूर्वी आणि 1 नोव्हेंबर 2003 नंतर झालेला नसावा. एससी आणि एसटी प्रवर्गासाठी वयात पाच वर्षांची आणि ओबीसींसाठी तीन वर्षांची सूट दिली जाईल.
अर्ज फी
SC/ST/PWBD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 200 रुपये आहे (फक्त सूचना शुल्क), तर इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

निवड प्रक्रिया : ऑनलाइन चाचणी, शैक्षणिक प्रमाणपत्र, वैयक्तिक मुलाखत आणि भरतीपूर्व वैद्यकीय चाचणी.

जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online