⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना झटका, आजपासून ‘या’ पेमेंटसाठी ‘इतके’ शुल्क आकारले जाणार

ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना झटका, आजपासून ‘या’ पेमेंटसाठी ‘इतके’ शुल्क आकारले जाणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२२ । आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड असलेल्या अशा करोडो ग्राहकांपैकी तुम्हीही एक असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण ग्राहकांना बँकेकडून एक एसएमएस आला आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की आज म्हणजेच 20 ऑक्टोबर 2022 पासून क्रेडिट कार्डधारकांना ऑनलाइन भाडे भरण्यासाठी 1 टक्के शुल्क भरावे लागेल.

असे काही एसएमएस बँकेकडून ग्राहकांना आले आहेत-
‘प्रिय ग्राहक, 20-ऑक्टोबर-22 पासून, तुमच्या ICICI बँक क्रेडिट कार्डवरील भाड्याच्या देयकावरील सर्व व्यवहारांवर 1% शुल्क आकारले जाईल.’

हा नवा नियम 20 ऑक्टोबरपासून लागू होणार
ICICI ही पहिली बँक आहे जी भाड्यावर 1% आकारते. या बदलानंतर, तुम्हाला घरभाडे क्रेडिट कार्डद्वारे भरायचे आहे की अन्य कोणत्याही मार्गाने हे ठरवावे लागेल. हा नियम बँकेकडून 20 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. म्हणजेच पूर्ण महिन्यानंतर तुम्हाला 1 टक्के अतिरिक्त रक्कम द्यावी लागेल.

हा नियम कोणाला लागू होईल
हा नियम पेटीएम, क्रेड, मायगेट, रेडजिराफ किंवा मॅजिक ब्रिक्स यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे भाडे भरणाऱ्या लोकांसाठी आहे. आयसीआयसीआय बँकेच्या वतीने हा नियम लागू केल्यानंतर इतर बँकाही असा नियम लवकरच आणतील अशी अपेक्षा आहे.

आयसीआयसीआयने घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम त्या भाडेकरूंवर होणार आहे जे ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे घरभाडे भरतात. या नियमाच्या अंमलबजावणीसाठी एक महिन्याचा कालावधी ठेवण्यात आला आहे, जेणेकरून ग्राहकांना त्याची तयारी करता येईल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.