मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023

…विरोधाला विरोध म्हणून कितीही टिका करा; मी विकासकामे करत राहणार ! : मंत्री. गुलाबराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२३ । एकीकडे कामे सुरू असतांना तुम्ही विरोधाला विरोध म्हणून कितीही टिका करा; मी विकासकामे करत राहणार असून टिकेला कामातून उत्तर देण्यचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चावलखेडा येथे आयोजित सभेत केले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते चावलखेडा येथे विकासकामांचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील होते. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले की, पाण्यासारखं कोणतेही पुण्य नाही . मला मिळालेली पाणी पाजण्याची संधीमुळे मी भाग्यवान समजतो. अंजनी नदीवरील बंधार्‍यामुळे उन्हाळ्यात देखील विहिरीना पाणी असल्यामुळे शेतकर्‍यांना त्याचा फायदा झाला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत चावलखेडा ते पष्टाने ६ किमी या रस्त्याचे पुलासह डांबरीकरण – ४ कोटी ४२ लक्ष , झुरखेडा – खपाट ते पिंपळेसीम या ५ किमी या रस्त्याचे लहान मोठ्या मोर्‍यासह डांबरीकरण – ३ कोटी ७७ लक्ष असे एकूण ८ कोटीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून या रस्त्यांचा कायापालट होणार आहे. चावलखेडा युवकांसाठी साहित्यसह व्यायामशाळा , हनुमान मंदिर परिसरात सभामंडप , बौध्द विहार बांधकाम व भिल्ल वस्तीत सामाजिक सभागृह मंजूर करणार असल्याची ग्वाही दिली तर ……तुम्ही विरोधाला विरोध म्हणून कितीही टिका करा; मी विकासकामे करत राहणार असून टिकेला कामातून उत्तर देण्यचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चावलखेडा येथे आयोजित सभेत केले.

या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन

भूमिपूजन – ६ मीटर चे ३ गाळे , १८ मी. लांबीचा बोरखेडा गावाजवळील नाल्यावरील पूल – १ कोटी २० लक्ष, साठवण बंधारा – १ कोटी , बोरखेडा येथील बंधारा भूमिपूजन किंमत ३५ लक्ष, चावलखेडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना ५० लक्ष, बोरखेडा ते वंजारी रस्ता – ३५ लक्ष, लोकार्पण ६ मीटरचे ५ गाळे एकूण ३० मी. लांबीचा मुसळी ते बोरखेडा रस्त्यावरील झिरी नदी वरील पूल पोहोच रस्ता – -१ कोटी ५० लक्ष, १ कोटी, , जिल्हा परिषद शाळा संरक्षण भिंत – २० लक्ष, गाव अंतर्गत पेव्हर ब्लॉक – १४ लक्ष , १ कोटी २३ लक्ष रुपये इतके, चावालाखेडा गावांतर्गत विविध विकास कामे – ६६ लक्ष

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी व्यासपीठावर उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, तालुकाप्रमुख गजानन पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, बोरखेडा वि.का.स सोसा.चे धनंजय सूर्यवंशी, माजी सभापती भगवान पाटील, अनिल पाटील, पिंप्री उपसरपंच मंगल पाटील, गजानन बापू पाटील , युवा सेनेचे भैया महाजन, आबा माळी, दीपक भदाणे, शेतकरी सेनेचे विनायक महाजन, किशोर पाटील, सरपंच अरुण गायकवाड , उपसरपंच बंडू पाटील, सा.बा.चे उप अभियंता एस.डी. पाटील , शाखा अभियंता नितीन पाटील, प्रिया इंगळे, कृणाल इंगळे, अशोक चौधरी, सुभाष पाटील, वि.का.सो.सदस्या रूखमाबाई साळवे, विजय पाटील, वसंत पाटील, सुभाष चौधरी, किशोर चौधरी, डॉ.प्रमोद पाटील, रामा चौधरी, वसंत आबा, अरुण गंगाधर पाटील, शिवाजी पाटील, राजू आण्णा, कैलास पाटील, गोपीचंद पाटील, सुनिल पाटील, अनिल चौधरी, कैलास पाटील, युवासेना उप तालुका प्रमुख अनिकेत पाटील, उपविभाग प्रमुख महेश पाटील, प्रशांत पाटील, परेश पाटील, राकेश पाटील, प्रदीप पाटील व शेकडो शिवसैनिक व युवासेना कार्यकर्ते.. सर्व ग्रा.पं. सदस्य, सोसायटीचे संचालक, यांच्यासह परीसरातील सरपंच व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.