भाजपमधील मित्रांची मला मते मिळाली : खडसेंचा गौप्यस्फोट

जून 20, 2022 10:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२२ । विधान परिषद निवडणुकीत एकनाथराव खडसेंचा विजय झाला असून खडसेंना २९ मते मिळाली आहे. विजयानंतर खडसेंनी माध्यमांशी संवाद साधत मला मिळालेली अतिरिक्त मते भाजपमधील माझ्या मित्रांची असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

एकनाथराव खडसे पुढे म्हणाले की, भाजपमध्ये असतांना त्यांनी मला राजीनामा देण्यास भाग पाडले. माझ्या राजीनामानंतर देखील ते थांबले नाहीत. त्यांनी माझ्यामागे चौकशी लावली. आता भाजपवाले मला बेघर करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप खडसेंनी केला आहे.

Eknath Khadse

दरम्यान विधान परिषद निवडणुकीसाठी १० जागांसाठी होणारी चुर्शीची निवडणूक असतानाच संपूर्ण जळगाव जिल्ह्याची ज्या निकालावर नज़र लागली होती. तो निकाल समोर आला आहे. तो म्हणजे एकनाथराव खडसे पुन्हा एकदा निडून आले आहेत. त्यांना २९ मते मिळाली.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now