⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव | ज्यांचा आयुष्यभर विरोध केला त्या पवार साहेबांमुळेच मी मंत्री झालो : ना.गुलाबराव पाटील

ज्यांचा आयुष्यभर विरोध केला त्या पवार साहेबांमुळेच मी मंत्री झालो : ना.गुलाबराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालकमंत्र्यांचा मोठा खुलासा, धरणगाव येथे माजी आ.मुरलीधर अण्णा पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । माझी अक्खी हयात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध प्रचार करण्यात गेली. कार्यकर्ता असल्यापासून मी राष्ट्रवादीचा फक्त विरोधच केला मात्र तेव्हा मला हे माहित नव्हत कि, मला हेच पवार साहेब मंत्री करतील असे प्रतिपादन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले.

धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे दिवंगत माजी आमदार मुरलीधरअण्णा पवार यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा दि.१५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा.शरद पवार यांच्या सोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, सार्वजनीक बांधकाम राज्यमंत्री दत्ता भरणे, जैन समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा राष्ट्रवादीचे निरिक्षक अविनाश आदीक, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आदींसह अन्य मान्यवर देखील चांदसर येथील कार्यक्रमाला उपस्थित होते.

पुढे बोलताना ना.गुलाबराव पाटील म्हणाले की, ज्या परिसरामध्ये मी राजकारणाची सुरुवात केली ते चांदसर हे गाव आहे. शालेय जीवनापासून आण्णा साहेबांची राजकीय कारकीर्द पाहायला मिळाली. प.स.सदस्य असताना अण्णा साहेबानी मला त्यावेळेस आशीर्वाद दिले होते. या परिवाराशी माझा संबंध आला. या परिसरात अण्णांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही कार्य करीत आहोत. व्यक्तीगत राजकारणाला कधी महत्व दिले नाही विचारांच्या राजकारणामुळे आपण काम करू शकलो असेही त्यांनी बोलताना सांगितले.

पवार साहेबांवर जळगाव जिल्हावासियांचे अपार प्रेम : ना.जयंत पाटील
हाडाचा कार्यकर्ता कसा असतो हे चित्र मुरलीधर अण्णांनी आपल्या समोर उभे केले. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी जळगाव ते नागपूर दिंडी झाली होती. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचे काम झाले. हि दिंडी महाराष्ट्रभर गाजली अजज अशा प्रकारचे संघर्ष फार कमी दिसतात. आज काल व्हाट्स अप चे युद्ध आहे. घर बसल्या ट्विट करणे आणि महाराष्ट्र आणि देशाला उद्देशून भाष्य करणे हा अली कडे रडीचा डाव झाला आहे. सामान्य माणसात जाऊन कार्य करणे खरे काम आहे आणि पवार साहेबानी हा संघर्ष केला आहे. त्यामुळे आजही पवार साहेबांवर जनता भरभरून प्रेम करते. राष्ट्रवादीत सर्वात मोठे भांडवल काय तर पवार साहेबानी जोडलेली माणसं, त्याच आदर्शने मुरलीधर अण्णांनी देखील काम केले असेही ते म्हणाले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.